पहुरमध्ये चोरट्यांचा उच्छाद : किराणा दुकान फोडले


पहूर : बसस्थानक समोरील कृषी पंडित कॉम्प्लेक्समधील मुळचंद झुंबरलाल चोरडिया यांच्या स्वामी समर्थ प्रोव्हिजन दुकानाचे शटर कुलूप तोडत चोरट्यांनी दुकानातून सुमारे पाच हजारांच्या रोकडसह 12 हजारांचा किराणा सामान लांबवल्याने खळबळ उडाली. मंगळवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी दुकान मालक आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दुकानातील मालाची तपासणी केली असता दुकानातील गावराणी तुपाचे डब्बे, तेल पाउच, काजू, बदाम, व्हील, लक्स, डव आदी प्रकारचे साबण, पाउडर तसेच किरकोळ वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बनसोड, ज्ञानेश्वर ढाकरे व पोलिस कर्मचारी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !