कर्जबाजारी शेतकर्‍याची पथराडला आत्महत्या


धरणगाव : तालुक्यातील पथराड येथील शेतकर्‍याने कर्जाचा डोंगर वाढल्याने विवंचनेत विष प्राशन करून आत्महत्या केली. किशोर सुरेश जाधव (44, रा.पथराड, ता.धरणगाव) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे.
मंगळवारी शेतकरी घरात झोपल्यानंतर ब्ुधवारी सकाळी पत्नी व कुटुंबीयांनी त्यांना आवाज दिला मात्र दरवाजा उघडत नसल्याने काही लोकांच्या मदतीने दरवाजा तोडला असता शेतकर्‍याने विषारी कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली. पिऊन पडलेला होता असे लक्षात आले.

कर्जाच्या विवंचनेत आत्म्हत्या
किशोर जाधव यांच्याकडे तीन बीघे शेती असून यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे सर्व पिकांचे नुकसान झाले व त्यातच कर्जाचा डोंगर वाढल्याने शेतकर्‍याने आत्महत्येचे पाऊल उचलले, असे ग्रामस्थ आणि आप्तस्वकीयांनी सांगितले. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. किशोरच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !