पंचायत राज समितीची फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयास भेट


फैजपूर : जळगांव जिल्हा दौर्‍यावर सोमवारपासून पंचायत राज समिती आली आहे. समिती मंगळवारी विविध तालुक्यात भेटी देत असून पाल, ता.रावेर येथे समिती जात असताना ऐतिहासिक भूमी असलेल्या काँग्रेस ग्रामीणचे पहिले अधिवेशन झालेल्या धनाजी नाना महाविद्यालयात समितीने मंगळवारी दुपारी भेट देऊन स्मृतीस्थळास अभिवादन केले. आमदार शिरीष चौधरी यांनी सर्व माहिती देऊन समितीतील सदस्यांचा सत्कार केला. या समितीत गटप्रमुख आमदार अनिल भाईदास पाटील, आमदार माधवराव जवळगावकर व आ.डॉ देवराम होळी यांची उपस्थिती होती. ऐतिहासिक पावन भमिीत आमचे पाय लागले हे आमच्यासाठी भाग्यच असल्याचे कमेटीतील आमदारांनी सांगितले.आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी लिलाधर चौधरी, डॉ.पी.आर.चौधरी, एन.ए.भंगाळे, किशोर चौधरी, एम.टी.फिरकेख, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, पं.स.सदस्य शेखर पाटील, योगेश सोपान पाटील, धनंजय शिरीष चौधरी, डॉ.राजेंद्र पाटील, नीळकंठ चौधरी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !