भुसावळात ई श्रम कार्ड नोंदणी महामहोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद


भुसावळ : भारतीय जनता पार्टी, भुसावळ शहरतर्फे माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी व माजी नगरसेविका मीना लोणारी यांच्या सौजन्याने असंघटित कामगार नोंदणी व ई-श्रम कार्ड महामहोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे तर उद्घाटक म्हणून आमदार संजय सावकारे होते. शहराध्यक्ष परीक्षित बर्‍हाटे यांची विशेष उपस्थिती होती. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त सेवा व समर्पण अभियाना अंतर्गत असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने नव्याने सुरू केलेल्या ई-श्रम योजने अंतर्गत मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी अभियान महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास उपनगराध्यक्षा सोनी बारसे, भाजप जिल्हा सरचिटणीस शैलेजा पाटील, माजी नगरसेविका मीना लोणारी, नगरसेवक राजेंद्र नाटकर, प्रा.दिनेश राठी, महेंद्रसिंग ठाकूर, राजेंद्र आवटे, संतोष बारसे, सतीश सपकाळे, लक्ष्मण सोयंके, महिला मोर्चा अध्यक्षा अनिता आंबेकर, भाजप सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, कायदे आघाडीचे शहराध्यक्ष अ‍ॅड.अभिजीत मेने, अनुसूचित जाती शहराध्यक्ष राहुल तायडे, भाजपयुमो शहराध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी, विलास अवचार, धनराज बाविस्कर, जयंत माहुरकर, संजय बोचरे, शिशिर जावळे, नरेंद्र बर्‍हाटे, गोपीसिंग राजपूत, अमित असोदेकर, सरचिटणीस नंदकिशोर बडगुजर, कपिल लोणारी, गौरव लोणारी, चेतन सावकारे, इरफान गवळी, कृष्णा शिंदे, प्रवीण कुटे, सागर जाधव तसेच स्थानिक नागरीक, असंघटीत क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !