भुसावळात 5 ऑक्टोबरला कॅम्पस इंटरव्ह्यू


भुसावळ : शहरातील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स व सिद्धवेद टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि कौशल्य विकास मुक्त विद्यालय व व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, पुणे यांच्या सहकार्याने मातृभूमी चौकतील संतोषी माता हॉलमध्ये मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021रोजी नामांकित कंपन्यांतर्फे कर्मचारी भरतीसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील 30 पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांचे अधिकारी मुलाखती घेण्यासाठी उपस्थित राहणार आहे. इयत्ता दहावी/बारावी/ग्रॅज्युएट/पोस्ट ग्रॅज्युएट/ डिप्लोमा /बीई/ व आयटीआय पास वा नापास विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांची निवड केली जाणार आहे. कॅम्पस मुलाखती नंतरच निवडलेल्या विद्यार्थ्यांचा दोन ते तीन दिवसात मुलाखतीची दुसरी फेरी घेण्यात येईल त्यानंतर त्यांना नियुक्तीपत्र सुद्धा मिळणर आहे. जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9021921184/ 9175815200/9607691711 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !