मालवाहू वाहनातून 13 हजाराची रोकड लंपास


अमळनेर : शहरातील जपान जीनसमोर उभ्या असलेल्या मालवाहू गाडीतून 13 हजार रुपयांची रोकड लांबवण्यात आली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश रघुनाथ महाजन (30, रा.माळीवाडा, अमळनेर) हे कुरकुरे विक्री करण्याचे काम करतात. दरम्यान, सोमवार, 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास त्यांनी शहरातील जपान जीनसमोर त्यांची मालवाहू गाडी पार्किंगला लावली असता संशयीत आरोपी दीपक पांडुरंग भोई (30, रा.तांबापुरा, जळगाव) याने मालवाहू गाडीतून 13 हजार रुपयांची रोकड चोरून नेले. या प्रकरणी नीलेश महाजन यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अमळनेर पोलिसांनी संशयीत आरोपी दीपक भोई याला अटक केली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !