खुनातील गुन्ह्यात पॅरोलवर सुटलेल्या आरोपीचा महिलेवर बलात्कार


नाशिक : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीने सिडको परिसरातील एका ब्यूटी पार्लरमध्ये बळजबरीने प्रवेश करीत तेथील एका महिलेला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. मंगळवारी रात्री उशिरा नितीन अशोक पवार याला पोलिसांनी सीबीएस परीसरातून अटक केली.

चाकूच्या धाकावर अत्याचार
सोमवारी ब्यूटी पार्लरमध्ये संशयीत नितीन सुभाष पवार (32) हा बळजबरीने शिरला. त्याने चाकूचा धाक दाखवून तेथील एका महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादित म्हटले आहे. या घटनेनंतर मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत संशयीत आरोपीचा शोध घेण्याबाबत पोलीस अधिकार्‍यांना सूचना दिल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !