अल्पवयीन तरुणीवर बलात्कार : आरोपीला अटक


पिंपरी : अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतच आहे. लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला व यातून मुलगी गर्भवती राहिली. याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली. रुपीनगर आणि मोशी येथे 20 मार्च ते 27 ऑगस्ट या कालावधीत हा प्रकार घडला. विठ्ठल मंकाळ पवार (वय 20, रा. ओटास्कीम निगडी), असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. पीडित 17 वर्षीय मुलीने याप्रकरणी मंगळवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे अमिष दाखवले. त्यातून तिला रुपीनगर येथे आणि एका महाविद्यालयात वारंवार भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर आरोपीने त्याच्या दुचाकीवरून पीडित मुलीला मोशी येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गरोदर राहिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !