संतापजनक : पित्यानेच अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार


संगमनेर : राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून मुंबईसह डोंबिवली घटना ताज्या असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील घटना संगमनेर येथे पित्यानेच मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक बाब उघड झाल्याने नराधम पित्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोटच्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पित्याने लैंगिक अत्याचार केल्याची बाब शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वाडीत घडली. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 11 वर्षीय पिडीतेची आई बाहेरगावी गेली असताना या काळातच 22 जुलैच्या रात्री, 28 जुलैच्या रात्री आणि यानंतर दोन आठवड्यानंतर, असे तीन वेळा पित्याने आपल्याच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी मुलीच्या आईने बुधवारी रात्री उशिरा फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी पित्याला तत्काळ अटक केली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या अधिक तपास करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !