पाचोर्‍यात सव्वा लाखांचे अवैध बायोडिझेल जप्त


पोलिस व पुरवठा विभागाची संयुक्त कारवाई

पाचोरा : शहरातील जारगांव चौफुलीजवळ एका दुकानातून 1 हजार 600 लिटर अवैध बायोडिझेलचा साठा जप्त करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली. जारगांव चौफुली नजीक सय्यद सलिम यासीन (नुरानी नगर, पाचोरा) यांचे दुकान असून गुरुवार, 30 रोजी पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, विकास पाटील, गोपनीय विभागाचे पोलिस कॉन्स्टेबल सुनिल पाटील, किशोर पाटील, विनोद बेलदार, निलेश गायकवाड, योगेश पाटील, दिलीप सुरवाडे, पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक उमेश पुरी, अव्वल कारकून एस. एस. पाटील, शिव पाटील या पथकाने घटनास्थळी जावून तपासणी केली असता अवैध बायोडिझेलने भरलेले 200 लिटरचे 8 बॅरल आढळून आल्यानंतर ते जप्त करण्यात आले.

सव्वा लाखांचे बायोडिझेल जप्त
एक लाख 25 हजार रुपये किंमतीचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बायोडिझेलचे नमुने ताब्यात घेऊन सदरील दुकान सील करण्याची कारवाई करण्यात आली. पाचोरा पोलिसात पुरवठा निरीक्षक उमेश पुरी यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या कारवाईमुळे शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली.

अपेक्षित टक्केवारी न मिळाल्याने यावल नगराध्यक्षांनी केला भ्रष्टाचाराचा आरोप !


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !