संगायो सदस्य नितीन महाजन यांचा दशमाता ग्रुपतर्फे सत्कार


फैजपूर : दिव्यांग सेना शहराध्यक्ष नितीन महाजन यांची संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका सदस्यपदी निवड झाल्याने शहरातील दशमाता ग्रुपतर्फे महाजन यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर फैजपूर गावासह तालुक्यातील दिव्यांग व निराधार व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध राहु असे नितीन महाजन यांनी सांगितले. शहरातील दशमाता ग्रुपच्या अध्यक्षा किरण कोल्हे, संजय चौधरी, गौरव चौधरी, ललित वाघूळदे, प्रवीण कोल्हे, गोपाळ चौधरी, विनोद गलवाडे, ऊमेश वायकोळे, गौरव चौधरी, देवेद्रं चौधरी, जयश्री चौधरी, निलेश पटील, उत्कर्षा चौधरी,साक्षी चौधरी, नाना मोची व दशमाता ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार : 24 वर्षीय तरुणाला अटक 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !