चाळीसगावातील तितुर व डोंगरी नदीला महिनाभरात सातव्यांदा पूर
चाळीसगाव : शहरासह तालुक्यावर आभाळमाया कोसळल्याने जलसंकट निर्माण झाले असून तितुर व डोंगरी नदीला महिनाभराच्या कालावधीत तब्बल सातव्यांदा पूर आल्याने पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुरामुळे दुकानांमध्ये पाणी शिरत असल्याने दुकानात माल भरावा अथवा नाही ? असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. दरम्यान चाळीसगाव शहरासह तालुक्यात गेल्या महिनाभरापासून सातत्याने बरसणाऱ्या पावसामुळे तितुरसह डोंगरी नदीला आतापर्यंत सहाव्यांदा पूर आल्यानंतर शनिवारी पुन्हा झालेल्या पावसानंतर महिनाभराच्या कालावधीत सातव्यांदा पूर आल्याने पुन्हा संकट निर्माण झाले आहे. आज पुन्हा नदीची जळपातळी वाढल्यास शहरात नदीकाठची कुटुंबीय आणि दुकाने असलेल्या व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
