सावद्यात पालिका निवडणूक स्वबळावर : आमदार चंद्रकांत पाटील
सावदा : शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार, 1 रोजी विश्रामगृहावर पार पडली यावेळी. आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकीत आपल्याला स्वबळावर निवडणूक लढवण्याची असल्याने सर्वांनी स्वबळाची तयारी करावी व सर्व नागरीकांपर्यंत आपण करीत असलेल्या व शासकीय योजनांची माहिती पुरवावी, असे आवाहन यावेळी जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकार्यांना केले. यावेळी लाला चौधरी, शाम पाटील, शहरप्रमुख सुरज परदेशी, उपशहरप्रमुख गौरव भैरवा, मिलिंद पाटील, शहर संघटक निलेश खाचणे, शरद भारंबे, युवा सेना शहर प्रमुख मनीष भंगाळे, गणेश माळी, वेडू लोखंडे, किरण गुरव, नितीन सपकाळे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








