भडगाव ते जुना पिंपळगाव बुद्रुक रस्ता डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लावणार : आमदार किशोर पाटील यांचे आश्वासन
आमदार किशोर पाटील यांना भडगावच्या शेतकर्यांचे निवेदन : उपोषणाचा इशारा
भडगाव : भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागून घोडदे देवस्थानामार्गाने जुना पिंपळगाव बुद्रुक रस्ता जातो. या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरुन रस्त्यात खड्डा कि खड्डयात रस्ता हेच वाहनधारकांसह पायी चालणार्या भाविक, शेतकर्यांनाही समजत नाही. रस्त्यावर पाणी साचुन चिखलाचेही साम्राज्य पसरलेले आहे. या रस्त्याच्या दुर्दशेमुळे भाविकांसह शेतकरी, वाहनधारकांना मोठ्या यातना सहन कराव्या लागतात. भडगाव ते जुन्या पिंपळगाव बुद्रुक रस्त्याचे डांबरीकरणासह ठिकठिकाणी नाल्यांवर उंच फरशी पुलही तत्काळ मंजुर करावा, रस्ता कामाला सुरूवात करावी अन्यथा भडगाव, टोणगाव शिवारातील शेतकरी आमरण उपोषणास बसतील, पुढील होणार्या परीणामास प्रशासन जबाबदार राहील, अशा इशार्यावजा मागणीचे भडगाव-पाचोरा आमदार किशोर पाटील यांना देण्यात आले. यावेळी शेतकर्यांशी चर्चा करतांना हा प्रश्न लवकरात-लवकर मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन आमदार किशोर पाटील यांनी शेतकर्यांना दिले.
खड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारक त्रस्त
आमदार किशोर पाटील यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागुन घोडदे देवस्थान ( हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतीक) देवस्थान आहे. या घोडदे देवस्थानामार्गाने जुना पिंपळगाव बुद्रुक रस्ता जातो. या रस्त्यालगतच नवनाथ महाराजांचे देवस्थान आहे. या दोघा देवस्थानावर दर्शनासाठी भाविकांची वर्षभर गर्दी असते. या रस्त्यावर छोट्या-मोठ्या खड्डयांचे साम्राज्य पसरलेले आहे. सध्याही रस्त्यावर चिखल अन खड्डे पडल्याने पाणी साचल्याने खड्डयात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच वाहनधारक, बैलजोडीगाडी, पायी चालणार्या भाविक व शेतकर्यांना समजत नाही. असेही निवेदनात म्हटले आहे. वाहनधारकांसह शेतकर्यांनाही नियमित वापरणे, शेती माल वाहतुकीसाठी मोठया ञासाचे ठरत आहे. या रस्त्याच्या दुर्दशेमुळे शेतकर्यांना यातना सहन कराव्या लागतात. रस्त्यावर पाणी साचते. त्यात रस्त्यावर नाल्याचे पाणी वाहात असल्याने रस्त्यावर पुराचे पाणी वाहत असल्याने शेतकर्यांना वापरणे बंद होते. शेतकर्यांनाही रस्त्यावर वापरणे नेहमी ञासाचे ठरते. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी होत आहे. तरी भडगाव ते जुना पिंपळगाव बुद्रुक रस्ता तात्काळ डांबरीकरणाचा मंजुर करावा. रस्त्याचे कामाला तात्काळ सुरुवात करावी. तसेच नाल्यांवर ठिक ठिकाणी उंच फरशीपुल बांधण्यात यावेत. टोणगाव शिवार नगर परीषद हद्दीत येतो. व रस्ता कायमस्वरुपी भाविकांना, वाहनधारकांना, शेतकर्यांना वापरास सोयीचा करावा. प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी. अन्यथा भडगाव टोणगाव शिवारातील सर्व शेतकरी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबवतील. असा इशाराही निवेदनाद्धारे देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्याधिकारी भडगाव नगर परीषद , सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परीषद विभागाकडे पाठविण्यात आलेल्या आहेत. असेही शेवटी निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना यांची उपस्थिती
या निवेदनावर नथा भिवा अहिरे, इंदल लालचंद परदेशी, जफरखान जहागीरखान पठाण, नसीरोद्धीन रुकमोद्धीन पठाण, सिराजोद्धीन रुकमोद्धीन पठाण, प्रकाश आनंदा सुर्यवंशी, अवधुत अर्जुन महाजन, संजय लालचंद परदेशी, हरी लालचंद परदेशी, अमिन शेख उस्मान शेख, इनायतशहा महबुबशहा फकीर, नाजीमोद्धीन उसनुद्धीन शेख, नाजीम शेख रशीद शेख, सलीमोद्धीन ताजोद्धीन शेख, रफीउद्धीन चिरागोद्धीन शेख, शेफीउद्धीन रुसनोद्धीन शेख, कलीमोद्धीन न्याजोद्धीन शेख, शरद रमेश वाडेकर, वाल्मीक तुळशीराम वाडेकर, आनंदा उत्तम भोई, छोटु उत्तम भोई, भरत विठ्ठल महाजन, राजेंद्र दयाराम पाटील आदि शेतकर्यांच्या सहया आहेत.
