मित्राला वाचवण्याच्या प्रयत्न तरुणही बुडाला
पारोळा : पाण्यात बुडणार्या मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात तालुक्यातील लोणी येथील तरूणाचा बुडून मृत्यू झाला. लोणी बुद्रुक ते लोणी खुर्द या दोन्ही गावांना जोडणार्या रस्त्यावर लहान पुल असून दोन्ही गावातील ग्रामस्थ ये-जा करण्यासाठी या पुलाचा वापर करतात. या पुलाची आता दयनीय अवस्था झाली असून पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. सध्या सुरू असणार्या पावसामुळे या पुलाखाली असलेल्या नाल्यातील खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शनिवारी दुपारी एक वाजता लोणी येथील दीपक संदीप भील व त्याचे काही मित्र गेले होते. या वेळी किशोर दिनकर हा तरुण पाय घसरून पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दीपक भील याने पाण्यात उडी घेतली. मात्र यात त्याचाच पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत दीपकवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावल शहरातील तरुणीची गळफास घेत आत्महत्या

