जळगावात रस्त्यांची दुर्दशा थांबवा : महापालिकेची झोप उघडण्यासाठी मनसेचे ‘झोप काढा आंदोलन’


जळगाव : रस्त्यांची दुरुस्ती करावी या मागणीसाठी शहर मनसेने सोमवारी महापालिकेसमोर झोप काढा आंदोलन केले. आठवडाभरात रस्त्यांची सर्वत्र कामे सुरु न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला. जळगाव शहरातील रस्त्यांची भयानक दुर्दशा झाली आहे. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

महापालिका आयुक्तांना निवेदन
मनसेचे रस्ते, सुविधा आघाडीचे जिल्हा संघटक राजेंद्र निकम आणि आंदोलनकर्त्यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात तीन वर्षांपासून रस्त्यांचे आणि भूमिगत गटारीचे काम सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची वाताहत झाली. पावसाळ्यात खराब रस्त्यांच्या त्रासाने सगळेच वैतागले आहेत यापूर्वीही या मागणीसाठी महापालिकेला निवेदने दिली आहेत. महापालिका सांगते की, पैसे नसल्याने रस्त्यांची कामे होऊ शकत नाहीत वसुलीची सगळी रक्कम अमृत योजनेसाठी वापरली जाते. सरकारकडून मिळणार निधी आणि स्थानिक वसुली कुठे जाते ? हा प्रश्न आता लोक विचारत आहेत.

तक्रारी करूनही प्रशास झोपेत
मनसेचे जिल्हा सचिव अ‍ॅड.जमील देशपांडे यांनी सांगितले की , वारंवार मागण्या करून आणि निवेदने देऊनही महापालिका रस्त्यांबद्दल काहीच करत नाहीय प्रशासन झोपेत आहे. त्यांना जाग यावी म्हणून आज हे झोप काढा आंदोलन केले. आठवडाभरात कारवाई न झाल्यास पुन्हा जनतेला सोबत घेऊन अनोखे आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. लोक कर देतात त्यामुळे रस्त्यांसह सगळ्या सुविधा देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. रस्ते चांगले होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलने सुरूच ठेवू, असेही ते म्हणाले.

निवेदनावर यांची स्वाक्षरी
या निवेदनावर मनसेचे जिल्हा सचिव अ‍ॅड.जमील देशपांडे, मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, जळगाव तालुकाध्यक्ष मुकुंद रोटे, संदीप मांडोळे, संदीप महाले, संदीप पाटील, अविनाश पाटील, इमाम पिंजारी, सतीश सैंदाणे, विकास मिस्तरी, विरेश पाटील, चेतन आंढळकर, अविनाश जोशी, महेश सोनवणे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम, राजू बाविस्कर, महेश माळी, गणेश नेरकर, गोविंद जाधव, विशाल कुमावत, निलेश अजमेरा, संतोष सुरवाडे, रमेश भोई, मनोज खुले, निलेश खैरनार, अ‍ॅड.दिनेश चव्हाण, मंगेश भावे, सिद्धेश कवठाळकर, गोरख गायकवाड आदींची नावे आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !