नशिराबाद टोल नाक्यावर स्थानिकांना रोजगार द्यावा
जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस सेवा फौऊंडेशनची नही प्रकल्प संचालकांकडे मागणी
जळगाव : नशिराबाद येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या टोल नाक्यावर संगणक चालक, फास्टट्रॅक बॉय, सुरक्षा रक्षक म्हणून स्थानिकांना रोजगार द्यावा तसेच यावलसह रावेर तालुक्यातील व जिल्ह्यातील स्थानिक जनतेला, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी आणि इतर सामान्य जनतेला टोलमध्ये 80 टक्के सूट द्यावी तसेच फेकरी टोल नाका लवकरात लवकर बंद करावा, अशा मागणी जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस सेवा फौऊंडेशनतर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प अधिकारी चंद्रकांत सिन्हा यांना निवेदन देवून करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल, जिल्हा मीडिया प्रमुख तथा कोरपावली सरपंच विलास नारायण अडकमोल, रावेर लोकसभा अध्यक्ष सद्दामशाह खलीलशाह, जिल्हा उपाध्यक्ष मीनाक्षी जावरे उपस्थित होत्या.
