14 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण : चाळीसगाव शहरातील घटना
चाळीसगाव : घराबाहेर खेळायला जातो म्हणून गेलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलास अज्ञाताने पळवून नेल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. चाळीसगाव शहरातील हुडको कॉलनीतील शेख साखीर शेख कासम हे वरील ठिकाणी परीवारासह वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा अय्यान उर्फ सोनू शेख साखीर (वय-14) हा सोमवार, 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घरच्यांना घराबाहेर खेळायला जातो म्हणून सांगून गेला मात्र तो घरीच न परतल्यामुळे घरच्यांनी त्याला परीसरासह नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली परंतु अय्यान उर्फ सोनू शेख साखरे हा मिळून आला नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने माझ्या मुलाला फुस लावून पळविले आहे. याची खात्री झाल्यानंतर शेख साखीर शेख कासम यांनी लागलीच चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम- 363 प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास एपीआय बिरारी हे करीत आहेत.
