जुनोनेत बंद घर फोडले : एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल लंपास


अमळनेर : तालुक्यातील जुनोने गावातील एका महिलेच्या बंद घरातून चोरट्याने रोकडसह सोन्याचे मंगळसूत्र मिळून एकूण एक लाख 8 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मालतीबाई कैलास पाटील (52) या महिला आपल्या कुटुंबीयांसह राहतात. शेती काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवार, 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेच्या दरम्यान ते घराला कुलूप लावून शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या. बंद घर असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून घरात ठेवलेल्या लोखंडी कोटीतील 93 हजार रुपयांची रोकड आणि 15 हजार रुपये किंमतीचे पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी मालती पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !