45 वर्षीय महिलेचा विनयभंग
पारोळा : तालुक्यातील बोरी येथे 45 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पारोळा तालुक्यातील बोरी येथे राहत असलेल्या 45 वर्षीय महिला आपल्या कुटुंबीयांसह राहतात. संशयीत आरोपी दिलीप पुंडलिक निकम याने 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास महिलेचा विनयभंग केला. दरम्यान तिला मारहाण करून शिवीगाळ देखील केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात दिलीप निकम याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहे.

