पाचोर्यात महावितरण कार्यालय चोरट्यांनी फोडले
पाचोरा : पाचोरा शहरातील सांगवी कॉलनीतील महावितरणचे बंद ऑफिस अज्ञात चोरट्यांनी फोडून सामानाची नासधूस करून कागदपत्रे फेकण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पाचोरा शहरातील संगवी कॉलनी येथे महावितरण कंपनीचे कार्यालय असून या ठिकाणी 3 ऑक्टोबर दुपारी 4 ते 4 ऑक्टोबर सकाळी 8 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने महावितरणाचे बंद कार्यालय फोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाट तोडले. कपाटात ठेवलेले कागदपत्र फेकून नुकसान केले. या प्रकरणी अतिरीक्त कार्यकारी अभियंता रवींद्र शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एएसआय प्रकाश पाटील करीत आहे.

