रेल्वे स्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला


जळगाव : जळगाव रेल्वे स्थानकावर एकाचा 35 ते 40 वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह मंगळवारी आढळला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅट फार्म क्रमांक 5 वर एका 35 ते 40 वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास आढळला. लोहमार्ग पोलिसांनी पंचनामा करून खाजगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवला. तरूणाचा दिर्घ आजाराने मृत्यू झाला असावा असा अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. याबाबत ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे. मयताच्या अंगावर निळ्या फिक्कट रंगाची जिन्स पॅन्ट, दाढी मिशी वाढलेली असे मयत तरूणाचे वर्णन आहे. ओळख पटल्यास जळगाव रेल्वे पोलिसांशी संपर्क करावे, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अनिंद्र नगराळे यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !