कारसाठी पाच लाख न रुपये आणल्याने विवाहितेचा छळ : पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा


मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : आरोपी मालेगाव तालुक्यातील सोयगावचे रहिवासी

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील तळोदे येथील माहेर आसलेल्या 29 वर्षीय विवाहितेने माहेरहून कार घेण्यासाठी पाच लाख रुपये न आणल्याने छळ करण्यातआला. या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चाळीसगाव तालुक्यातील तळोंदा माहेर असलेल्या योगीता भूषण हिरे (29) यांचा विवाह 18 फेब्रुवारी 2013 रोजी नाशिक जिल्ह्यातील सोयगाव येथील भूषण मधुकर हिरे यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाच्या सहा महिन्यानंतर पती भूषण अहिरे याने कार घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेला तगादा लावला परंतु आई-वडीलांची परीस्थिती हालाखीची असल्यामुळे पाच लाख रूपये देवू शकले नाही. त्यामुळे विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. यासाठी सासु सुनंदा, मधुकर अहिरे, नणंद पल्लवी किशोर अहिरे, नंदोई किशोर बाळासाहेब अहिरे (सर्व रा.सोयगाव,ता.मालेगाव, जि.नाशिक) यांनी गांज पाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता तळोंदे, ता.चाळीसगाव येथे माहेरी निघून आल्या. विवाहितेने पतीसह सासरच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती, सासू, नणंद आणि नंदोई या चार जणांवर मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार संजय पाटील करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !