पाटणादेवी मंदिर परीसरातील धबधब्यात बुडाल्याने 18 वर्षीय युवकाचा मृत्यू
चाळीसगाव : तालुक्यातील पाटणादेवी मंदिर परीसरातील धवलतीर्थ या धबधब्याजवळील डोहात पोहायला गेलेल्या 18 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडल्याने मृत्यू झाला. राहुल सुखदेव पवार (20, डोंगरगाव, मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चाळीसगाव ग्रामीण ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
चाळीसगाव तालुक्यातील पाटणा शिवारात धवलतीर्थ धबधब्याखाली अंघोळ करण्यासाठी गेलेल्या राहुल सुखदेव पवार (20) या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. पाटणा गावाचे पोलिस पाटील यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास ओंकार सुतार हे करीत आहेत.

