धक्कादायक ! बस चालकाची गळफास घेऊन आत्महत्या


उदगीर : उदगीर बस आगारात चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संजय रामराव केसगीरे (47) असे मयत बस चालकाचे नाव आहे. उदगीर आगारातील बसमध्ये (क्रमांक एम.एच. 20 बी.एल. 2160) मध्ये संजय केसगीरे यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.गेल्या महिन्यातच संगमनेरमध्ये बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला होता. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे तेथे आढळून आलेल्या चिठ्ठीवरून समोर आले होते. त्या आधी गेल्या वर्षी कंडक्टरने आत्महत्या केली होती. तेव्हा एसटी कर्मचार्‍यांना पगार मिळत नसल्यामुळे या परीस्थितीला ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे चिठ्ठीत म्हणत जळगावमध्ये कंडक्टरने आत्महत्या केली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !