भुसावळात महिलेचे धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवले
भुसावळ : शहरात धूम स्टाईल मंगळसूत्र चोरीच्या घटनांचा तपास लागत नसतानाच पुन्हा शहरताील कस्तुरीनगरात घराबाहेर शतपावली करणार्या 55 वर्षीय महिलेच्या गळ्यातून 70 हजार रुपये किंमतीचे धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवण्याची घटना उघडकीस आल्याने महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, विवाहिता योगिता अनिल दीक्षित (55, मुक्तानंद कॉलनी, कस्तुरी नगर) या मंगळवार, 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता घराबाहेर पायी फिरत असताना दुचाकीवर आलेल्या एकाने काही कळण्यात महिलेच्या गळ्यातून अडीच तोळे वजनाची व 70 हजार रुपये किंमतीचे मंगलपोत हिसकावून पोबारा केला. महिलेने आरडा-ओरड केली मात्र तो पर्यंत भामटा पळण्यात यशस्वी झाला. महिलेच्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भादंवि 392 प्रणाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस प्रभारी निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश घायतड करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तसेच महिलेने सांगितलेल्या वर्णनाच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला आहे.








