पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थिती उद्या ऑक्सिजन प्लँटचे उद्घाटन
जळगाव प्रशासनाला पालकमंत्र्यांचा दौरा प्राप्त : विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी
जळगाव : : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गुरुवार, 7 ऑक्टोबर, 2021 रोजी जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. गुरुवार, 7 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 6.18 वाजता जळगाव रेल्वे स्थानक येथे अमृतसर एक्सप्रेसने आगमन व पाळधी, ता.धरणगाव, जि. जळगावकडे शासकीय वाहनाने प्रयाण व राखीव, सकाळी 9 वाजता पाळधी येथे अभ्यागत व कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा, सकाळी 10 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे ऑक्सिजन प्लँटच्या उद्घाटनास उपस्थित, सोईनुसार पाळधी, ता.धरणगावकडे प्रयाण व राखीव, दुपारी चार वाजता पाळधी, ता.धरणगाव येथून प्रयाण व धरणगाव तालुक्यातील विविध गावातील नियोजित कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता.धरणगावकडे प्रयाण व राखीव
