दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ
पतीसह सात जणांविरोधात जळगाव जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा
जळगाव : माहेरून 10 लाख रूपये न आणल्याने जळगावातील माहेर असलेल्या विवाहितेला मारहाण करून घराबाहेर काढण्यात आले. या प्रकरणी पतीसह इतर सात जणांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मैत्री शुभकर सपकाळे (20, रा.खान्देश मिल, जळगाव) यांचा विवाह वरणगाव फॅक्टरी येथील शुभकर प्रभाकर सपकाळे यांच्याशी जुन 2020 मध्ये झाला. सुरूवातीला पतीसह सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर माहेरी जावून वडीलांकडून 10 लाख रूपये घेवून ये असे सांगून पती शुभकर हा मारझोड करू लागला तसेच पैसे आणले तर घरात ये असे सांगून विवाहितेला घराबाहेर काढले. याला कंटाळून विवाहिता जळगाव येथे आइर्-वडीलांकडे माहेरी निघून आल्यात. विवाहितेने मंगळवार, 5 ऑक्टोबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती शुभकर प्रभाकर सापकाळे, सासू मंजूळा प्रभाकर सपकाळे, जेठ प्रशांत प्रभाकर सपकाळे, जेठानी ज्योती प्रशांत सपकाळे, ननंद माधुरी उल्हास बिर्हाडे, नंदोई उल्हास पाव्हणू बिर्हाडे (सर्व रा.वरणगाव, ता.भुसावळ) आणि नणंदची नणंद उज्वला प्रकाश तायडे (रा.पिंप्राळा) यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

