कुर्‍हाडीचे घाव घालून 40 वर्षीय इसमाचा खून : जळगाव तालुक्यात या गावातील घडली घटना


जळगाव : तालुक्यातील सावखेडा शिवारात श्रावण लालचंद भिल (वय 40) यांची डोक्यात कुर्‍हाडीने घाव घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. खुनाची माहिती मिळाल्यानंतर सहा. पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, तालुका पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. दरम्यान, खुनातील संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !