महिलेकडे विवस्त्र होऊन व्हिडीओ कॉलची मागणी


सातारा : उपनगरातील एका महिलेकडे विवस्त्र होऊन व्हिडीओ कॉल करण्याची मागणी केल्याप्रकरणी मिरज येथील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना 19 सप्टेंबर रोजी रात्री दहा ते 30 सप्टेंबर रोजी रात्री पावणेबारा या कालावधीत घडली. 30 वर्षीय पीडित महिला सातारा शहरातील एका उपनगरात राहते. ती घरी असताना संशयीत आारोपी साईराज नानासाहेब काळे (रा. भारतनगर, शंभर फुटी रोड, गवळी प्लॉट, मिरज, सांगली) याने त्याच्या मोबाईलवरुन पीडित महिलेला अश्‍लील मेसेज केले. साईराज याने त्या महिलेला रात्रीच्यावेळी विवस्त्र होऊन व्हिडिओ कॉल करायला सांगून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. दरम्यान, पीडित महिलेने साईराज याला ‘तू जे काही करतोस ते मी तुझ्या बहिणीला सांगेन,’ असे म्हटले असता त्याने याची माहिती कोणाला सांगितलीस तर तुला जीवे मारेन, असे धमकावत सर्व चॅट डिलीट करण्यास सांगितले. याप्रकरणी पीडित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर साईराज काळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर हे करत आहेत.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !