उपवासाला भगर खाताच एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा


जालना : जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. उपवासासाठी भगर खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सात वर्षाच्या मुलीसह सहा जणांना विषबाधा झाली. ही घटना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे घडली. या घटनेने परीसरात खळबळ माजली. नवरात्रोत्सवानिमित्त अनेकजण भक्तिभावाने नऊ दिवस उपवास करतात. त्यातच गुरुवारी पहिली माळ असल्याने अंतरवाली सराटी येथील तारक कुटुंबातील सदस्यांनी ही उपवास ठेवला होता. उपवास असल्याने सदस्य सकाळी 11 वाजता भगर खाऊन शेतात काम करायला गेले. गुरुवारी दुपारी 2.30 च्या सुमारास या सर्वांना शेतात मळमळ, उल्टी, थरकाप तसेच थंडी वाजून त्रास होऊ लागला. त्यांची बिघडलेली प्रकृती पाहून शेजारीच असलेल्या योगेश तारक यांनी ज्ञानेश्वर व कांताबाई तारक यांनी सोडता चौघांना बैलगाडीतून संभाजीनगर- बीड राष्ट्रीय महामार्गपर्यंत आणून नंतर वाहनाने त्यांना वडीगोद्री येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कांताबाई एकनाथ तारक (55), महादेव एकनाथ तारक (34), जगन्नाथ एकनाथ तारक (27), ज्योती महादेव तारक (30), सीमा जगन्नाथ तारख (22), ज्ञानेश्वरी जगन्‍नाथ तारक (7) यांना विषबाधा झाली असून यातील ज्योती तारीख यांची तब्येत खालावल्याने त्यांना अंबड येथील रुग्णालयात हलविण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !