बोदवड तालुक्यातील केळी नुकसानीची आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी
बोदवड : तालुक्यातील करंजी, भानखेडा, गोळेगाव येथे नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे केळीसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष शेतांमध्ये जावून पाहणी केली. शेतकर्यांना लवकरात-लवकर मदत निधी मिळण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, यांच्याशी चर्चा करण्यात आली. शेत रस्त्यांच्या दयनीय स्थितीबाबत तहसीदार प्रथमेश घोलप यांना निर्देश देत पाणंद रस्ते त्वरीत मंजूर करण्यााबत सूचना करण्यात आल्या. भानखेड्यात पावसामुळे पडलेल्या घराची पाहणी केल्यानंतर तहसीलदारांना संबंधित घर मालकास त्वरीत मदत करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
नुकसानीच्या पाहणीप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख गजानन गोडके, नगराध्यक्ष सईद बागवान, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, दीपक माळी, तहससीलदार प्रथमेश घोलप, कृषी मंडळ अधिकारी नूतन लांडगे, सरपंच जानकिराम पाटील, देशमुख, नगरसेवक आनंदा पाटील, नगरसेवक सलीक कुरेशी, नगरसेवक देवेंद्र खेवलकर, धनराज गंगतीरे, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक नितीन चव्हाण, नगरसेवक इरफान भाई, नगरसेवक अकबर बेग, डॉ.देविदास पाटील, तालुका संघटक शांताराम कोळी, शहरप्रमुख हर्षल बडगुजर, शिक्षक सेना तालुकाप्रमुख संदीप तायडे, अ.सं.जि.उपसंघटक कलीम शेख, विभाग प्रमुख गोपाळ पाटील, मुकेश महाजन, सुभाष देवकर, परेश अग्रवाल, गजानन पाटील, सलीम मण्यार, बाबा बागवान, गजानन भोंडेकर, भूषण भोई, आनंद खोडके, सचिन भोई, शिवसैनिक व पदधिकारी व परीसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
