अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रदीप पवार
जळगाव : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रदीप गुलाबराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतची घोषणा राष्ट्रीय जनरल सचिव के.सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी 7 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी केली. जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून प्रदीप गुलाबराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदीप पवार हे भडगाव येथील देशमुखवाडीचे रहिवासी असून त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस कमिटीमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष शिरीषचौधरी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, राज्य पदाधिकारी डी.जी.पाटील, मावळते जिल्हाध्यक्ष ड.संदीप भैय्या पाटील, जिल्हा सरचिटणीस जमील शेख यांच्यासह मनोज सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, उद्धव वाणी, प्रमोद घुगे, भाऊसाहेब सोनवणे, समाधान पाटील जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.
विविध पदांवर केले काम
प्रदीप पवार हे भडगाव येथील देशमुखवाडीचे रहिवासी आहेत. विद्यापीठ प्रतिनिधी, एनएसयुआयचे महाराष्ट्र सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश सेवादल उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी त्यांना मिळाली आहे. सन 1992 मध्ये भडगाव पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले. जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती म्हणून काम पाहिलेले आहे.








