कुंटणखाना चालवणारा आरोपी जाळ्यात : दोन महिलांची सुटका
नागपूर : नवीन नागपूर म्हणून ओळखल्या जाणार्या मनीष नगर मधील भागात ओयोची सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती कळताच पोलिसांनी कारवाई केली. दोन महिलांची सुटका करण्या आली असून कुंटणखाना चालविणार्या आकाश साहू यास अटक करण्यात आली. आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर क्राईम ब्रांचने सापळा रचून आरोपीला अटक केली.
