अनोळखी तरुणाचा मृतदेह गाडेगाव शिवारातील विहिरीत आढळला
जामनेर : तालुक्यातील गाडेगाव येथील शिवारातील विहिरीत अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गाडेगाव शिवारातील हिंगणे गावाकडे जाणार्या रस्त्यावरील विहिरीत 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच पाचोरा विभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार पाटील, अतुल पवार, जगदीश सूर्यवंशी यांनी घटनास्थळी पाहणी केली. मयत इसमाच्या अंगात निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व हिरव्या रंगाचा ची टी-शर्ट आहे. या घटनेबाबत गाडेगावचे पोलीस पाटील भिमसिंग परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तरुणाबाबत ओळख पटत असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.

