मुक्ताईनगर पंचायत समितीच्या सभापतीपदी विकास पाटील बिनविरोध


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर पंचायत समिती सभापती सुवर्णा प्रदीप साळुंके यांनी राजीनामा दिल्यानंतर रीक्त झालेल्या जागेवर सुकळीचे विकास समाधान पाटील यांची शुक्रवारी पंचायत समितीत झालेल्या निवडणूक प्रसंगी बिनविरोध निवड झाली. पंचायत समिती झालेल्या निवडणूक प्रसंगी सहा.गटविकास अधिकारी तथा निवडणूक अधिकारी आर.एल.जैन होते. निवडीप्रसंगी उपसभापती सुनीता चौधरी, पंचायत समिती सदस्य सुवर्णा साळुंखे, शुभांगी भोलाणे, विद्या पाटील, राजेंद्र सवळे आदींची उपस्थिती होती.

माजी मंत्री खडसेंचे पंचायत समितीवर वर्चस्व
विकास पाटील हे एकनाथराव खडसे यांचे समर्थक असून मुक्ताईनगर पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे.
सभापती निवडीनंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे खेवलकर यांनी दूरध्वनीवरून विकास पाटील यांना शुभेच्छा दिल्या.सभापती निवडीवेळी पंचायत समितीत बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, राष्ट्रवादी सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान, पंचायत समितीचे माजी सभापती विलास धायडे, राजू माळी, दशरथ कांडेलकर, योगेश कोलते, माफदा अध्यक्ष रामभाऊ पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष शिवा पाटील, मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष नंदू हिरोळे, किशोर चौधरी, अतुल पाटील, बापू ससाणे, एजाज खान, शकील सर, रवींद्र दांडगे, संजय कोळी, निलेश बोराखडे, चंद्रकांत बढे, उमेश राणे, समाधान कार्ले, निवृत्ती भड, भैय्या पाटील, गजानन पाटील, मयुर साठे, वासुदेव बढे, प्रेमचंद बढे, गोपाळ पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !