जळगाव शहरात मनपा व्हॉल्व्हमनचा हृदयविकाराने मृत्यू
महापालिकेच्या अधिकार्यांनी सुट्टी न दिल्याने कामाच्या ताणातून मृत्यू : नातेवाईकांचा आरोप
जळगाव : महापालिकेत वॉलमनचा पाणी सोडत असतांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. आजारी असतांना महापालिकेच्या अधिकारीने सुट्टी दिली नाही. कामाच्या ताणातून हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विष्णू पुंडलिक धांडे (57, रा.सुनसवाडी, ता.भुसावळ ह.मु. तळेले कॉलनी, जुना खेडी रोड) असे मयत झालेल्या महापालिका कर्मचार्याचे नाव आहे.
सुटी न मिळाल्याने कामाच्या ताणातून मृत्यू
रविवारी सकाळी शहरातील जुने जळगाव कोल्हे वाडा येथे सुरू केलेला व्हॉल बंद करण्यासाठी धांडे हे गेले असता त्यांचा चक्कर आले आणि हृदय विकाराचा झटका आला आणि जागीच मृत्यू झाला. डॉक्टरांनी आराम करण्यासाठी सांगितले परंतू महापालिकेच्या अधिकार्यांच्या आडमुठेपणामुळे त्यांना सुटी दिली नाही. या आजाराच्या ताणातून विष्णू धांडे यांचा मृत्यू झाला, असा आरोप जावई महेश नेमाडे (जळगाव) यांनी माध्यमांशी बोलताना केला. मयत धांडे यांच्या पश्चात पत्नी जयश्री, मुलगा तेजस आणि विवाहित मुलगी सीमा असा परीवार आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

