जिलेटिनद्वारे स्फोट घडवत एटीएम फोडले


अहमदनगर : एटीएम मशिन फोडण्यासाठी चक्क जिलेटीनच्या कांड्यांचा वापर करण्यात आल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे उघडकीस आली. या घटनेत तब्बल चार लाखांची रोकड लंपास झाली. लोणी खुर्द गावातील वेताळबाबा चौकात असलेल्या टाटा इंडिकॅशचं एटीएम आहे. दरोडेखोरांनी हे एटीएम जिलेटीन कांड्याच्या सहाय्याने फोडलं आहे. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, डीवायएसपी संजय सातव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे तसेच अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहे. दरोडेखोरांनी एटीएममधील 4 लाख 5 हजार रूपयांची रोकड लुटून नेली आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून तातडीने तपास सुरू असून पथकंही रवाना झाली आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !