चाळीसगावातील कॅनरा बँकेबाहेरून चोरट्यांनी दुचाकी केली लंपास
चाळीसगाव : शहरातील कॅनेरा बँकेसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवली. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चाळीसगाव शहरातील दत्तवाडी येथील दुर्गेश आण्णा गवळी (30) यांनी शहरातील कॅनेरा बँकेसमोर उभी केलेली दुचाकी (क्र.एम.एच.19 बीपी 0277) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 3 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 वाजता घडली. शोध घेवूनही दुचाकी न नआढळल्याने 22 हजार रुपये किंमतीच्या हिरो होंडा प्लस दुचाकी चोरीला गेल्याचे स्पष्ट झाल्यावर दुर्गेश आण्णा गवळी यांनी लागलीच चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक भुषण पाटील करीत आहेत.
