करकंब शहरात 17 रोजी कैकाडी समाजाचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा


महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज युवक संघ व संघटनेतर्फे मेळाव्याचे आयोजन

पंढरपूर : कैकाडी समाज संघ, संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता करकंब (पंढरपूर) येथे पदाधिकारी मेळावा होत आहे. क्षेत्रिय बंधन, सत्कार सोहळा व समाजाच्या पुढील कल्याणाकरिता ध्येय धोरणे ठरविण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

यांची मेळाव्यास प्रमुख उपस्थिती
माजी आमदार यशवंतराव (तात्या) माने, हनुमंत माने गुरुजी (कार्याध्यक्ष- कैकाडी समाज संघ महाराष्ट्र राज्य), लालासाहेब जाधव (अध्यक्ष-कैकाडी समाज संघ, महाराष्ट्र राज्य), रघुनाथ जाधव (डी.वाय.एस.पी.), जयशंकर माने (उपाध्यक्ष- कैकाडी समाज संघ महाराष्ट्र राज्य), ज्ञानेश्वर माऊली जाधव (अध्यक्ष- कैकाडी समाज संघटना महाराष्ट्र राज्य), राहुल जाधव (अध्यक्ष- कैकाडी समाज युवक संघ/संघटना महाराष्ट्र राज्य), सतीश माने (कार्याध्यक्ष- कैकाडी समाज युवक संघ महाराष्ट्र राज्य), पी.आर.गायकवाड (राज्य सचिव- कैकाडी समाज संघटना), विकी जाधव (सचिव- कैकाडी समाज युवक संघटना/संघ महाराष्ट्र राज्य), पप्पू जाधव (अध्यक्ष-कैकाडी समाज युवक संघटना), रवींद्र गायकवाड (वरणगाव) (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष- खानदेश कैकाडी समाज संघटना/संघ महाराष्ट्र राज्य), उद्धव गायकवाड (ज्येष्ठ नेते विदर्भ), शिवनारायण गायकवाड (सरपंच- हर्सूल), शीला जाधव (विदर्भ प्रमुख- महिला आघाडी, कैकाडी समाज संघटना/संघ), दीपक जाधव (उपाध्यक्ष- उत्तर महाराष्ट्र, कैकाडी समाज संघटना) आदी पदाधिकारी उपस्थित राहतील. उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !