पार्टीला बोलावत महिला डॉक्टरवर सहकाऱ्याने केला बलात्कार


मुंबई : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना कायम असून पार्टीला बोलावत चक्क एका महिला डॉक्टरवरच सहकारी डॉक्टरांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एम्सच्या एका महिला डॉक्टरने तिच्या वरीष्ठ डॉक्टरवर बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांनी पीडित महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आरोपी डॉक्टर फरार झाला आहे. महिला डॉक्टरने पोलिसांना सांगितले की, एम्समधील आपल्या सहकाऱ्याचा वाढदिवस होता, त्याने पार्टीला बोलावले म्हणून वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. तेव्हा तिथे आलेल्या वरिष्ठ डॉक्टरने बलात्कार केला. पोलिसांनुसार ही घटना 10 ऑक्टोबरच्या रात्रीची आहे. बर्थडे पार्टीमध्ये अन्य लोकही आले होते. आरोपीने त्यांच्या नकळत संधी साधली आणि बलात्कार केला. पोलिसांनी मॅजिस्ट्रेटसमोर पीडित महिलेचा जबाब नोंदविला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !