वैफल्यग्रस्त अवस्थेतून सेवानिवृत्त पोलीस अधिकार्‍याची आत्महत्या


ठाणे : सेवानिवृत्त पोलीस अधिकार्‍याच्या आत्महत्येचे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. बाळासाहेब साळुंखे (62) असे मयत अधिकार्‍याचे नाव आहे. ठाणे शहर वाहतूक शाखेतून निवृत्त झालेल्या पोलीस जमादार साळुंखे यांनी परीसरातील एका खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ठाणे शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेतून चार वर्षापूर्वी निवृत्त झालेले साळूंखे हे वागळे इस्टेट, श्रीनगर भागात वास्तव्याला होते. गेल्या काही महिन्यांपासून वैफल्यग्रस्त असलेले साळुंखे तीन दिवसांपूर्वीच घरातून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास येऊरच्या जंगलात त्यांनी एका खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पॅन्टच्या खिशातील ओळखपत्रच्या आधारे त्यांची ओळख पटली. त्यांनतर त्यांच्या कुटूंबीयांनीही हा त्यांचा मृतदेह असल्याचे सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा आणि एक मुलगी असा परीवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलीस उपायुक्त डॉ.विनय राठोड यांनी सांगितले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !