क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरण : आर्यन खानचा जामीन फेटाळला


मुंबई : क्रूज ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी अटक केलेल्या सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याचा बुधवारी ज एनडीपीएस कोर्टाने बुधवारी जामीन फेटाळून लावला. यावेळी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दोन अक्षरी सूचक वक्तव्य केलं आणि त्याकडे मीडियाचं लक्ष आकर्षिलं गेलं. त्यांनी दोनच शब्दांत सार्‍या प्रकरणाबद्दल सूचक प्रतिक्रिया दिली ते दोन शब्द होते सत्यमेव जयते! आज देखील सार्‍या बॉलिवूडचं आर्यन खानच्या जामीनावरील सुनावणीकडे लक्ष लागलं होते मात्र कोर्टाने दणका देत आर्यन खानचा जामीन फेटाळला आहे. निष्णात वकील आर्यन खानच्या सुटकेसाठी सरसावले असले तरी कोर्टाने मोठा दणका देत आर्यनच्या जामिनाला नकार दिला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !