लाचखोर लेखाधिकारी मानकरच्या घरात सापडले रोख 11 लाख रुपयांसह दीड किलो चांदी


अहमदनगर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अटकेत असलेला मनपाचा मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर याच्या घरात साडेअकरा लाख रुपयांची रोकड, तब्बल 540 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने तर दीड किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू आढळल्या आहेत. रोख रकमेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीला मानकर याच्या पत्नीने समाधानकारक उत्तरे दिलेली नाही, अशी माहिती आहे. एका ठेकेदारला धनादेश देण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने मानकर याला बुधवारी दुपारी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर त्याला अटक करुन एक पथक त्याच्या घरझडतीसाठी रवाना करण्यात आले. तर गुरुवारी दुपारी तोफखाना पोलिसांनी प्रवीण मानकर (मूळ रा. फ्यांटसी, उत्तम टाऊन स्केप, विश्रांतवाडी) याला विशेष न्यायालयात हजर केले. अधिक तपासाकरिता त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने मानकर याला शुक्रवारपर्यंत 22 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !