भुसावळ ऑर्डनन्समधील कामगारांच्या मोर्चाने वेधले लक्ष


सरकारच्या खाजगीकरण धोरणाचा घोषणाबाजी करून निषेध

भुसावळ- ऑर्डनन्स फॅक्टरीत खाजगीकरणाला चालना देण्याच्या भारत सरकारच्या धोरणाविरोधात देशातील 41 ऑर्डनन्स फॅक्टरीत विविध आंदोलन केले जात आहे. भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीतील कामगारांनी गुरुवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता सुटी झाल्यानंतर घोषणाबाजी देत मोर्चा काढला. स्थानिक संयुक्त संघर्ष समितीतील पदाधिकार्‍यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. संयुक्त संघर्ष समितीतर्फे कन्हेनर कॉ. दिनेश राजगिरे यांनी संपाबाबत डीजीओएफ चेअरमन व कर्मचारी पक्षांची झालेल्या बैठकीची माहिती दिली. 20 ऑगस्टपासून संप अटळ असल्याचे कन्व्हेनर कॉ.दिनेश राजगिर, किशोर चौधरी, गजानन चिंचोलकर यांनी सांगितले. यावेळी संयुक्त संघर्ष समितीचे एन.बी.भिडे, किशोर पाटील, विक्रम अनदाते, किशोर बढे, विजय सालके, विनोद तायडे, एम.डी.वानखेडे आदी उपस्थित होते.


कॉपी करू नका.