माजी महसूलमंत्री खडसेंना दिलासा : भोसरी भूखंड प्रकरणी अंतरीम जामीन मंजूर


मुंबई : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केल्याने खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भोसरी येथील वादग्रस्त भूखंड प्रकरणात काही दिवसांपूर्वी एकनाथराव खडसे यांना कोर्टाने अटकेपासून संरक्षण प्रदान केले होते. यानंतर खडसे यांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. यात एकनाथराव खडसे यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केला आहे.

खडसेंना मोठा दिलासा
भोसरी येथील भूखंड प्रकरणात सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने एकनाथराव खडसे, त्यांच्या पत्नी मंदाताई आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह इतरांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी याबाबत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात गिरीश दयाराम चौधरी हे 5 जुलै पासून अटकेत आहेत. तर मंदाताई खडसे यांना जामीन मिळाला आहे. याच प्रकरणात आता नाथाभाऊंनाही अंतरीम जामीन मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.







  • पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले ; खासदारांना अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावे ! 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !