दिवाळी होणार गोड : एस.टी.कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ


परीवहनमंत्री अ‍ॅड.अनिल परब यांची घोषणा : अधिकार्‍यांना पाच हजार तर कर्मचार्‍यांना अडीच हजारांची दिवाळी भेट

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीची भेट म्हणून अधिकार्‍यांना 5 हजार रूपये तर कर्मचार्‍यांना 2500 रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परीवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल परब यांनी केली.

93 हजार कर्मचार्‍यांना लाभ होणार
परीवहन मंत्री परब म्हणाले, या निर्णयाचा लाभ एस.टी.महामंडळाच्या सुमारे 93 हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकार्‍यांना होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्यांच्या 7 तारखेला होतात मात्र पगार यंदा नोव्हेंबरच्या 1 तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे. एस.टी.च्या कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होण्यासाठी सकारात्मक सहकार्याबद्दल मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचेपरब यांनी आभार मानले. महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचार्‍यांची मागणी होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कर्मचार्‍यांना 12 टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अधिकारी-कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता आता 17 टक्के होणार असल्याचे परब यांनी यावेळी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !