कृषी पंपासाठी वीजपुरवठा सुरळीत करून वीज तोडणी तत्काळ थांबवा


फैजपूरात भाजप व किसान मोर्चातर्फे जनआक्रोश : प्रांतांना निवेदनद्वारा आंदोलनाचा इशारा

फैजपूर : वीज महावितरण कंपनीने वीज पंपासाठी तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, बिलाअभावी तोडलेला वीजपुरवठा तत्काळ जोडावा अन्यथा रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा भाजप व भाजप किसान मोर्चातर्फे फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला. सातत्यपूर्ण अतिवृष्टीमुळे पावसाने खरीप हंगामात शेतकरी मोठ्या कर्जाच्या खाईत गेला असताना मात्र कसा-मसा रब्बीच्या पेरणीची लगबगीला लागला असतानाच महावितरणकडून कृषी वीज मोटर पंप बिल थकबाकी वसुलीसाठी थेट वीज ट्रान्सफार्मरचा वीजपुरवठा खंडित करून आडमुठेपणा अवलंबला जात आहे. महावितरण व राज्य शासन ऐन दीपावलीच्या सणात मोठा अनर्थ करून शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात करण्याचा प्रयत्न करीत असून पालकमंत्र्यांच्या आश्वासनालादेखील हरताळ फासली जात असल्याचा सूर व्यक्त करण्यात आला.

फैजपूर कृउबापासून शिस्तबद्ध मोर्चा
मंगळवार, 26 रोजी सकाळी 11 वाजता फैजपूर कृषी उत्पन्न बाजार उपसमिती पासून शिस्तबद्ध मोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी कार्यालयात मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य हर्षल पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मसाका चेअरमन शरद महाजन, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी यांनी मोर्चाला संबोधित केले. प्रास्ताविक तालुका सरचिटणीस विलास चौधरी यांनी केले. याप्रसंगी सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवणे याच्याशी प्रांताधिकारी कडलग व किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण बापू यांनी भ्रमणध्वनीद्वारा संवाद साधला असता त्यांनी काहीसा दिलासा दिला तर प्रांताधिकारी यांनी आपल्या भावना तात्काळ शासनापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले.




यांची होती उपस्थिती
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष उमेश हेगडे, तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नितीन राणे, तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, शहराध्यक्ष अनंता नेहेते, सरचिटणीस संजय सराफ, माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, जि.प.सदस्य सविता भालेराव, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष सागर महाजन, माजी सभापती डॉ.नरेंद्र कोल्हे, कृषी उत्पन्न उपसभापती उमेश पाटील, सदस्य योगीराज बर्‍हाटे, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस राकेश फेगडे, हर्षद महाजन, यशवंत तळेले, वसंत परदेशी, राजेश महाजन, मिठाराम सरोदे, अतुल भालेराव, प्रमोद वायकोळे, अनंता फेगडे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लग्नाच्या आमिषाने तरुणाकडून दोन लाख लाटले : दागिने लांबवणार्‍या दोघांविरोधात गुन्हा 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !