वृद्धाचे तोंड दाबून एक हजार लांबवले
चाळीसगाव : शहरातील एका 65 वर्षीय वृद्धाचे तोंड दाबून एका तरूणाने त्यांच्या खिश्यातील एक हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना मंगळवार, 26 रोजी घडली. या प्रकरणी एकाविरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचारी रामदास दौलत पाटील (65, रा.हिरापूर, ता.चाळीसगाव) हे मंगळवार, 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता शहरातील एचडीएफसी बँकेच्या एटीएमजवळ आल्यानंतर संशयीत आरोपी सनी विष्णू चव्हाण (22, रा.वडगाव गंगापूर, जि.औरंगाबाद) याने वृद्धाचे तोंड दाबून खिश्यातील एक हजारांची रुपंयाची रोकड काढून पळ काढला. रामदास पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास सहा.पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.
