महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार : चौघे सुदैवाने बचावले
भुसावळ : राष्ट्रीय महामार्गाने भुसावळातून जळगावकडे जाणार्या इंडिका कारने अचानक पेट घेतल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. सुदैवाने कारमधील चौघे वेळीच कारबाहेर पडल्याने कुणालाही इजा झाली नाही. तांत्रिक कारणांमुळे तापमान वाढून कार पेटल्याचा अंदाज आहे. भुसावळ येथून गणेश महादेव काळे (रा.भुसावळ) व त्यांचे तीन मित्र कारने (क्र.एम.एच.19-ए.एक्स. 6354) जळगावकडे निघाले होते. वाटेत साकेगाव येथील वाघूर नदीवरील पुलाच्या पुढे कार पेटली. कारमधील सर्वजण वेळीच बाहेर पडल्यामुळे कुणालाही इजा झाली नाही.
